Table of Contents
तोरणा किल्ला हा महाराजांनी जिंकलेला सगळ्यात पहिला किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करताना इसवी सन १ ६ ४ ७ मध्ये जिंकलेला सगळ्यात पहिला किल्ला ,तेव्हा महाराज १ ६ वर्षांचे होते .तोरणा किल्ला हा पुणे जिल्यातील वेल्हे तालुक्यातील वेल्हे गावा शेजारी आहे. महाराजांनी याच किल्ल्यावर स्वराज्याचे तोरण बांधले म्हणूनच या किल्ल्याला तोरणा हे नाव पडले .परंतु याच किल्ल्याचे अजून एक नाव आहे ‘प्रचंडगड ‘. प्रचंडगड हे नाव शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचा प्रचंड विस्तारामुळे ठेवले आहे .हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील सह्याद्री पर्वतरांगांमधील डोंगरी किल्ला आहे .तोरणा हा किल्ला पुणे जिल्ह्यातील दुर्गकोटातील अतिदुर्गम व अतिविशाल म्हणून प्रसिद्ध आहे .सह्याद्रीचा रांगेतून दोन पदर निघून पूर्वेला पसरत गेलेले आहेत यातील एका पदरावर तोरणा व राजगड हे आहेत तर दुसऱ्या पदरावर भुलेश्वर रांग आहे .या गडाच्या दक्षिणेला वेळवंडी नदी व उत्तरेला कानद नदी आहे .हा किल्ला गिरी दुर्ग प्रकारातील आहे .
गडावर जाण्याचा मार्ग
पुणे जिल्यातील वेल्हे गाव तोरणा किल्ल्याच्या पायथ्याशी आहे .पुणे -वेल्हे हे अंतर ६ ० किलोमीटर आहे .या किल्ल्यावरून रायगड किल्ला ,लिंगाणा ,राजगड किल्ला ,पुरंदर किल्ला ,सिंहगड किल्ला हे सर्व गड दिसतात .
किल्ल्यावरील ट्रेकिंग
१ ४ ० २ मीटर उंचीवर असलेला हा पुणे जिल्यातील सर्वात उंच डोंगरी किल्ला आहे. ट्रेकिंग करताना पाऊसामुळे हिरवागार झालेला किल्ला आणि रंगेबिरंगी फुले डोळ्यांचे पारणे फिटण्यासारखा असतो .अगदी फुलांचा एक छान बिछानाच जणू तसेच सभोवतालच्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांचे दृश्य हा ट्रेक रोमांचक , आणि अंगावर शहारे आणणारा आहे आणि तेथील धबधबे तर अतीशय मनमोहक,हृदयद्रावक तोरणा वरील निसर्गरम्य दृश्य पाहून ट्रेकिंग चा पूर्ण थकवाच निघून जातो . तोरणा किल्ल्यावरील वाढलेले गवत ,रंगेबिरंगी फुल आणि त्यावर भिरभिरणारी फुलपाखरे ,आणि त्यातून पायवाट काढत ट्रेकिंग खूप सुंदर अनुभव .किल्ल्यावर जाण्यासाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे सप्टेंबर ते फेब्रुवारी .
किल्ल्यावरील पायवाट
वेल्हे गावातून पायवाट चालू होते ,वेल्हे पोलीस स्टेशनचा पुढे रस्ता आहे .तेथूनच पायवाट सुरु होते .पुढे छोटा पूल लागेल मग किल्ल्याकडे जाणाऱ्या पायवाटेने डावीकडे पोहचाल पुढे गेला की उजवीकडे चांगली परिस्थिती असणारा रास्ता दिसेल जो पठाराकडे पोहचेल तिथे आपण आपली वाहने पार्क करू शकतो .डावीकडे पायवाट निवडा इथून अगदी सरळ जा हा मार्ग चिखलाचा आणि खडकांचा आहे त्यामुळे तो पावसाळ्यात मिसळला होतो आपल्याला इजा होऊ नये म्हणून ट्रेकिंग शूज ट्रेकिंग पोल वापरा पाय वाट विचित्र आहे एका पठारावर पोहोचेपर्यंत पुढे चालत राहा इथून जाणारी पायवाट हळूहळू कड्याकडे जाते पुढे लहान ओढा आहे ओढा ओलांडताना काळजी घ्या नंतर तुम्ही घनदाट जंगलात प्रवेश कराल या पायवाटेवर तुम्ही सुमारे एक तास ट्रेकिंग करून एका कड्यावर पोहोचाल.
तिथून तुम्हाला किल्ला आणि किल्ल्यावर जाणारी पायवाट दिसेल तुमच्या डावीकडे गुंजवणे धरण असलेल्या कड्यावरून दिसणारे दृश्य पाहण्यासाठी एक मिनिट काढा आता अंतिम टप्पा किल्ल्याच्या तटबंदीवर चढायला सुरुवात केली की मग या चढाइचा सुरुवातीचा भाग खडकाळ आणि निसरडा पायवाटेचा हा भाग अगदी काळजीपूर्वक आणि सावधान गिरीने पार करा पायवाटेवर सुमारे 30 मिनिटांच्या अंतरावर तुम्हाला आधारासाठी रेलिंग आणि कापलेल्या खडकांचा पायऱ्या आहेत दरवाजापर्यंत रेलिंग आहे परंतु काही रॅलींची अवस्था चांगली नाही दरवाजा मधून आत गेलात की रंगीबेरंगी फुलं पाय वाटेत आहेत चालत पुढे गेलात की किल्ल्याचा
दुसरा दरवाजा म्हणजेच महादरवाजा लागेल या दरवाजाच्या रचनेला गोमुख आकाराची रचना म्हणतात खूप मोठा बलाढ्य दरवाजा आहे हा महाद्वारातून पुढे आलात की एक कच्चा रस्ता जातो तो जातो तोरजाई देवीच्या मंदिराकडे शिवाजी महाराजांनी अनेक किल्ल्यांची पुनर्बांधणी केली त्यामध्ये 5000 पेक्षा जास्त रक्कम महाराजांनी तोरणा किल्ल्यासाठी खर्च केली पुढे गेलात की खोकड पाण्याची टाकी आहे आणि झुंजार माचीकडे जातानाच पुढे लक्कड खाना लागतो झुंजार माचीकडे जाण्यासाठी रेलिंग चा वापर करून खाली उतराव लागतं खरा ट्रेक तर झुंजार माचीकडे जातानाच आहे झुंजार माचीकडे जातानाच आपल्याला चोरवाट दिसते उतरण्यासाठी चोरवाट बाहेर पडण्यासाठी दार खूप छोट आहे त्यासाठी तुम्हाला दोन पायावर बसून आत यावं लागेल चोरवाटेपासून झुंजार माचीकडे जाताना रस्ता फक्त दगडांचा आहे बुरुजांमधून जावं लागतं खाली दरी आहे एकदम खडतर प्रवास करून आपण आता अंतिम टप्प्यात आलोय म्हणजेच झुंजार माचे सुंदर माझे खालील भुयार सुद्धा आपण पाहू शकतो झुंजार माचीवर देखील पाण्याचे टाके आहे पाण्याच्या टाकीचा पुढे आलात की तटबंदीमध्ये शिवकालीन शौचालय आहे
आता परतीचा प्रवास करतानाच कोकण दरवाजा आहे या दरवाजातून बुधला मातीचा रस्ता आहे आणि कायद्यासाठीचे जेल ही आहे पुढे चालत राहिलेत की खाली उतरताना मुदला माचीचा रस्ता आणि टकमक टोक या ठिकाणावरून समोरील प्रदेशांवर लक्ष ठेवता येत होतं तर मग टोकावरूनच बुधला माझी दिसते राजगडावर जातो टकमक टोकाच्या खाली एक चोर दरवाजा आहे गडावर गेला तर पाच वाजायच्या आत गडावरून निघा नंतर खूप अंधार पडतो.
किल्ल्यावरील मंदिरे
तोरणा किल्ल्याचे मुख्य द्वार म्हणजेच कोटीद्वार तेथून आत गेले की डाव्या बाजूलाच एक छोटेसे मंदिर आहे ते म्हणजेच तोरजाई मंदिर शिवकाळात इथे खोदकाम करत असताना सोन्याचे हांडे सापडले असे इतिहासात नोंद आहे.तिथूनच पुढे गेले की वाटेत हौद लागतो तिथून पुढे गेले की मेंगाई देवीचे मंदिर लागते ट्रेकिंग साठी आलेले सगळे किल्ले प्रेमी इथेच विसावा घेतात आणि तसेच मेंगाई मंदिराच्या समोरच महादेवाचे मंदिर आहे ते म्हणजेच तोरणेश्वर मंदिर.
तोरणा किल्ल्याचा इतिहास
१ ४ व्या शतकातील तोरणा या किल्ल्याचा निर्माण
इतिहासात हा किल्ला कोणी व कधी बांधला याची कुठेही नोंद नाही या किल्ल्याचा निर्माण इसवी सन 14 व्या शतकाच्या शेवटच्या काळात झाला असावा या किल्ल्याचा शैलीवरून असे वाटते की हा किल्ला शैव पंथाचा आश्रम असावा असा अंदाज आहे त्याचा विस्तारच खूप आहे म्हणूनच महाराजांनी किल्ल्याला अगदी योग्य नाव दिले आहे प्रचंडगड.
स्वराज्याची मुहूर्तमेढ
19 फेब्रुवारी 1630 महाराजांचा जन्म झाला तेव्हा पूर्ण भारतावर मुघलांचे राज्य होते त्यामुळे जनतेचे खूप हाल होत असे आपण लढूनच स्वतः राज्य निर्माण करावं असं महाराजांच्या लहानपणापासूनच मनात होतं आणि त्यांच्या व त्यांच्या आई म्हणजेच माँसाहेब राजमाता जिजाउंचे संस्कार होते यासाठी त्यांनी मावळ भागातील तरुणांना एकत्रित करण्याचे कार्य हाती घेतले.महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेऊन मावळ प्रांत काबीज करण्याच्या हालचाली सुरू केल्या इसवी सन १६४७ मध्ये महाराजांनी तोरणा जिंकला तेव्हा त्यांचे वय अवघे सोळा वर्षे होते तोरणा किल्ला हा विजापूरच्या बादशहाच्या ताब्यात होता पण किल्लेदार होता मराठा किल्लेदाराशी बोलून महाराजांनी किल्ल्यावरील सर्व बादशाही झेंडे काढून मावळ्यांच्या हिंदवी स्वराज्याचा भगवा किल्ल्यावर फडकवला.
तोरणा किल्ला – गुप्तधन
महाराजांनी गडाचे दुरुस्तीचे काम सुरू केले खूप काम करताना सोन्याची नाणी असणाऱ्या चार घागरी सापडल्या त्यातूनच महाराजांनी तोरणावर राजगडाची बांधकाम केले जिथे या घागरी सापडल्या तेथे महाराजांनी तोरणजाई देवीचे मंदिर बांधले
तोरणा किल्ल्यावर कोणी कोणी राज्य केले
इसवी सन 1470 ते 1486 च्या दरम्यान बहुमनी राजवटीसाठी मालिक अहमद याने हा किल्ला जिंकला पुढे हा किल्ला निजामशाहीत गेला काही वर्षातच विजापूरचा आदिलशहाने यावर विजय मिळवला नंतर महाराजांनी तो ताब्यात घेतला गडावर इमारती बांधल्या किल्ल्याची दुरुस्ती केली महाराजांनी जिर्णोद्धार केला संभाजी महाराजांच्या निधनानंतर हा किल्ला मुघलांकडे गेला पण शंकरजी नारायण सचिवांनी तो परत स्वराज्यात आणला परत मराठ्यांच्या ताब्यात आणला पुढे इसवी सन 1704 मध्ये औरंगजेबाने किल्ल्याभोवती घेरा घातला व लढाई करून आपल्या ताब्यात आणला व याचे नाव फ़ुतूउलगय म्हणजेच दैवीविजय ठेवलं नंतर चार वर्षांनी हा किल्ला परत सरनोबत नागोजी कोकाटे यांनी गडावर लोक चढवून मोठी लढाई केली आणि धाडसाने पुन्हा किल्ला स्वराज्यात आणला हा किल्ला बादशाह औरंगजेबाने लढाई करून जिंकलेला हा एकमेव किल्ला आहे आणि सरनोबत नागोजी कोकाटे यांनी हा किल्ला स्वराज्यात आणून त्यावर मावळ्यांचा भगवा फडकवला.







